Thursday, December 11, 2008

Moong Dosa

Ingredients
२ वाट्या सालीची मुगडाळ
१ वाटी उडीदडाळ (सालीसहीत असेल तर चांगले)
४-५ हिरव्या मिरच्या
१ छोटा तुकडा आले
३-४ टीस्पून मीठ (चवीप्रमाणे)बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर वरुन घालण्यासाठी (ऎच्छीक)

Method
डाळी धुवुन कमीत कमी ५ ते ६ तास भिजवाव्यात. त्यानंतर त्यात मिरच्या, आले, मीठ घालुन नीट वाटुन घ्यावे. अगदी बारीकच झाले पाहीजे असे नाही. पण खुप जाडसर असु नये. वाटलेले पीठ साधारण ६-७ तास झाकुन ठेवावे. हवामानानुसार कमीजास्ती अंबते ते गरजेपुरते पुरेसे होते. करतेवेळी शक्यतो non stick तव्यावर करावे. साधारण २ डाव पीठ नीट पसरवुन घ्यावे खुप पातळ असु नये. वरुन कांदा कोथिंबीर पसरावी आणि झाकण घालावे. साधारण २ मिनीटानी उलटावे ती बाजु भाजुन झाली की नारळाच्या ओल्या चटणीबरोबर खायला द्यावे.

No comments: